मुंबई महानगरपालिका निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात आता राजकारणाला ऊत आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून आतापासून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप दंगल घडवण्याचा प्रयत्न करेल. मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा, असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ते गुहागर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
#BhaskarJadhav #Shivsena #EknathShinde #BJP #UddhavThackeray #BMCElection #HWNews